स्वर कुणाचा आज येतो कापरा कानावरी
भैरवी गातो कुणी हा कोणत्या तालावरी
शब्द सारे टोचणारे घाव या हृदयावरी
दाटूनी येतो गळा जेंव्हा तुला मी आठवी

असचं.....

तुझं माझं प्रेम कुणापासून लपलं नाही
म्हणुनच का ते कुणालाही रुचलं नाही
++++++++++++++++++++++++++
आयुष्याच्या वाटेवर बरं वाईट सारचं घडलं
शेवटी मात्र दोघांनाहि आपलं मी पण नडलं
++++++++++++++++++++++++++
घड्याळ्याचे काटे फिरतात काळ मात्र थांबला आहे
वाट तुझी पाहण्यात वसंतही लांबला आहे
++++++++++++++++++++++++++
मार्ग तुझा माझा वेगळा बोलुन सखे निघून गेलिस
नकळत येउन बोचणारी एक आठवण ठेउन गेलिस
++++++++++++++++++++++++++
आठवण तुझी आली की मनं प्याला भरतं
शेवटी दोघं रितेच हे त्याला देखिल कळतं

मी एक पक्षी

मी एक पक्षी ... पंख नसलेला
सिमेंटच्या घरट्यात अडकून बसलेला

ईच्छा कितिही असली तरी उडणं मला शक्य नाही
पटकन मिळतील पंख असा जादुचा मंत्र नाही
कसा उडून जाउ सांगा प्रपंच आहे मागे
कितिही नकार दिला तरी जुडले आहेत धागे

बरं नुस्ती झेप घेउन थोडिच काही होणाराय
घरट्यातल्या पिल्लांनकडे लक्श्य कोण देणाराय
म्हणुन आता सर्व सोडून घरटं पक्कं करतोय
पंख मिळे पर्यंत मी जमिनिवरच चालतोय

असा मी एक पक्षी ... पंख नसलेला
सिमेंटच्या घरट्यात अडकून बसलेला

एक गरम चहा

मी आणि मित्र माझा, एक गरम चहा
आयुष्यातला गुंता सारा दूर करतो पहा

सौ जेव्हा माझी कधी भडकते माझ्यावर
प्रेमच राहिलं नाही तुझं म्हण्ते घरी गेल्यावर
एक चहाचा गरम कप मी आणुन देतो तिला
म्हण्तो विसर सारं काही साडी घेऊया तुला

आई वडील जेव्हा माझे येतात माझ्या घरी
घरतलं भांड कधी न रहालाय वाजल्या परी
लगेच सर्वांसाठी मी करतो गरम चहा
म्हणतो सिरीयल टिव्हिच्या थोड्या कमी पहा

कामावरून बॉस जेव्हा ऑफिसातला भडकतो
सुट्टी मला देण्यावरून तो जेव्हा अडकतो
मगवतो मी त्याच्यासाठी एक गरम चहा
म्हण्तो काम सारं करतो सुट्टीच ते पहा

चौकातला मामा जेव्हा सिग्नल साठी अडवतो
चलान साठी त्रास देउन उगाच मला नडवतो
त्याला सुधा देतो मी खर्च चहा पाण्याचा
तुम्ही काय मी काय मार्ग एकच जाण्याचा

कुणास ठाऊक कसा पण हा मित्र आहे खरा
अडकलेली कामे लावतो मार्गी भरा भरा
विश्वास नसेल बसत तर करून तुम्ही पहा